
Josh Hazlewood Injury Update: ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जॉश हॅझलवूड याला दुखापतीमुळे ॲडलेड कसोटीत सहभागी होता आले नाही. कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी झाल्यानंतर भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामधील तिसरा कसोटी सामना १४ ते १८ डिसेंबर यादरम्यान द गॅबा, ब्रिस्बेन येथे होणार असून, हॅझलवूड या कसोटीत खेळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.