
भारतीय क्रिकेट संघाला सध्या मुख्य खेळाडूंच्या दुखापतींची चिंता सतावत आहे. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहही पाठीच्या दुखापतीमुळे सध्या क्रिकेटपासून दूर आहे, तर मोहम्मद शमीच्या तंदुरूस्तीवरही सध्या प्रश्नचिन्ह आहे.
तसेच नुकतेच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात निवडलेला वरुण चक्रवर्तीच्याही पोटरीला सुज आल्याचे बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्याआधी सांगितले होते.