
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. त्यामुळे आता सर्व संघांची त्यानुसार तयारी सुरू झाली आहे. भारतीय संघ १५ फेब्रुवारी रोजी दुबईला रवाना होणार असून २० फेब्रुवारीला पहिला सामना बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे.
त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने आजी-माजी खेळाडू आपापली मतं मांडत आहेत. सुरेश रैनानेही भारतीय संघाबाबत प्रतिक्रिया दिली असून प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते याबाबत मत मांडले आहे.