विराट कोहलीला हवीय दौऱ्यावर कुटुंबाची सोबत...! कपिल देव म्हणतात सुवर्णमध्य काढा
विराट कोहलीने बीसीसीआयच्या नव्या आचारसंहितेला थेट विरोध केलेला नसला तरी दौऱ्यावर हॉटेल रूमवर असताना एकटेपणा खायला उठतो, विरह सहन होत नसल्याचे मतप्रदर्शन त्याने केले होते.
नवी दिल्ली, ता. १८ (पीटीआय) ः परदेश दौऱ्यावर असताना खेळाडूंसोबत कुटुंब सोबत असण्याला माजी दिग्गज खेळाडू कपिल देव यांनी समर्थन दिले आहे, परंतु या मुद्यावर वेगवेगळे मतप्रवाह असल्यामुळे बीसीसीआयने सुवर्णमध्य काढावा, असेही कपिल देव यांनी सुचवले आहे.