Why did Karun Nair leave Vidarbha cricket team : भारत-इंग्लंड यांच्यात पहिल्या कसोटीला आजपासून सुरुवात होणार आहे आणि करुण नायर हा ८ वर्षांनंतर टीम इंडियाच्या कसोटी संघात पुनरागमनासाठी सज्ज आहे. करुणने इंग्लंडविरुद्ध तिहेरी शतक झळकावले होते, परंतु त्यानंतर त्याचा फॉर्म गेला आणि तो संघाबाहेर झाला. पण, मागील दोन वर्षांत त्याने देशांतर्गत स्पर्धा गाजवून पुन्हा कसोटी संघात एन्ट्री घेतली आणि आता तो पुमरागमनासाठी तयार आहे. त्याने इंग्लंड लायन्सविरुद्धच्या सराव सामन्यात द्विशतकही झळकावले. करुण नायर पुनरागमन करत असताना त्याच्याबाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे.