
Karun Nair BCCI Snub: Rahane-Pujara Link Sparks Controversy : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आणि त्यात करुण नायरचे नाव नसल्याने सर्वांना आश्चर्य वाटले. भारताकडून २०१७ मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळणाऱ्या करुणने विजय हजारे ट्रॉफीच्या यंदाच्या पर्वात अविश्वसनीय कामगिरी केली. विदर्भ संघाचे नेतृत्व करताना त्याने सर्वाधिक ७७९ धावा केल्या आणि संघाला फायनलपर्यंत घेऊन गेला. त्याने पाच शतकं झळकावली आणि त्याच्या धावांची सरासरी ही ३८९.५० इतकी राहिली. त्यामुळे त्याची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठीच्या संघात निवड व्हावी अशी मागणी होती. पण, त्याला ती मिळाली नाही.