२७ चेंडू ११२ धावा! अजित आगरकरने ज्याला ४ सामने खेळवून हाकलले, त्याने द्विशतक झळकावून उत्तर दिले; निवड समितीला चॅलेंज...

Karun Nair’s Back-to-Back Hundreds : रणजी ट्रॉफी 2025–26 हंगामात कर्नाटकच्या करुण नायरने पुन्हा एकदा फलंदाजीचा जलवा दाखवत केरळविरुद्ध शानदार द्विशतक झळकावलं. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने केवळ चार सामन्यांनंतर नायरला संघातून बाहेर केलं होतं.
Karun Nair hits a magnificent double century against Kerala

Karun Nair hits a magnificent double century against Kerala

esakal

Updated on

Karun Nair double century against Kerala Ranji Trophy 2025–26 : इंग्लंड दौऱ्यातून जवळपास आठ वर्षांनी भारताच्या कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या करुण नायरला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. हेच कारण देताना निवड समिती प्रमुख अजित आगरकर ( Ajit Agarkar) याने घरच्या मैदानावरील वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतून त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. यावर करुणनने नाराजीही व्यक्त केली, परंतु त्याने क्रिकेटच्या मैदानातूनही उत्तर दिले. रणजी करंडक स्पर्धेत पुन्हा कर्नाटकच्या संघात परतलेल्या करुणने सलग दोन शतकं झळकावली. केरळविरुद्ध त्याने शतकाचे द्विशतकात रुपांतर करताना घरच्या मैदानावर होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दावा ठोकला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com