KARUN NAIR TILAK VARMA: दुलीप ट्रॉफीत करुण नायर-तिलक वर्मामध्ये वाद; नायरने शतक ठोकून दिलं उत्तर? नेमकं काय घडलं

KARUN NAIR TILAK VARMA DULEEP TROPHY CONTROVERSY: दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात करुण नायरला संधी न मिळाल्यानंतर त्याने दक्षिण विभागाचा संघ सोडला आणि केएससीए सेक्रेटरी इलेव्हनकडून खेळताना शानदार शतक ठोकलं. त्यानंतर नायरच्या सोशल मीडिया पोस्टमुळे तिलक वर्मासोबतच्या वादाची चर्चा सुरू झाली.
KARUN NAIR TILAK VARMA DULEEP TROPHY CONTROVERSY

KARUN NAIR TILAK VARMA DULEEP TROPHY CONTROVERSY

esakal

Updated on

KARUN NAIR TILAK VARMA DULEEP TROPHY CONTROVERSY: दुलीप ट्रॉफी २०२६ च्या अंतिम सामन्यादरम्यान करुण नायर आणि तिलक वर्मा यांच्यातील वाद चर्चेत आला आहे. करुण नायरचा दक्षिण विभागाच्या संघात समावेश होता. मात्र, उपांत्य फेरीच्या सामन्यात कर्णधार तिलक वर्माने त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली नाही. त्याच्या जागी युवा फलंदाज कोडिमाला हिमातेजाला संघात घेतलं.

तिलक वर्माने नायरला का खेळवलं नाही, याचं कारणही सांगितलं होतं. उत्तर विभागाच्या संघात अनेक डावखुरे फिरकी गोलंदाज असल्यामुळे दक्षिण विभागाला मधल्या फळीत डावखुरा फलंदाज हवा होता. त्यामुळे हिमातेजाला संधी दिल्याचं तिलकने सांगितलं. तिलकने याला रणनीतीचा भाग असल्याचं म्हटलं आणि नायरचं वगळणं हे त्याच्यासाठी दुर्दैवी असल्याचंही सांगितलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com