Big Setback for India Ahead of 1st Test : भारत-इंग्लंड यांच्यातला पहिला कसोटी सामना उद्यापासून सुरूवात होतोय. विराट कोहली, रोहित शर्मा, आर अश्विन या सीनियर खेळाडूंच्या अनुपस्थितीत होत असलेला हा पहिलाच कसोटी सामना आहे आणि त्यामुळे शुभमन गिलचं नेतृत्व व फॉर्म याकडे सर्वांचे जरा जास्तच लक्ष आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाने जोरदार तयारी केली आहे. इंग्लंड लायन्सविरुद्ध दोन सराव सामने, भारत अ विरुद्ध सराव सामन्यात सर्व खेळाडूंनी घाम गाळला. त्यातून पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हन कशी असेल, याचे चित्रही स्पष्ट झाले होते. पण, काल सराव सत्रात भारताचा प्रमुख फलंदाज जखमी झाला आणि त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जातेय.