Sanju Samson celebrates his century for Kerala in Vijay Hazare Trophy
esakal
Sanju Samson opening for Kerala in Vijay Hazare: संजू सॅमसनने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत दमदार शतक झळकावून निवड समितीची डोकेदुखी वाढवली आहे. केरळ संघाचे प्रतिनिधित्व करताना संजू झारखंडविरुद्ध सलामीला खेळायला आहे. ३१२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संजू व कर्णधार रोहन कुन्नूमल यांनी पहिल्या विकेटसाठी २१२ धावांची भागीदारी केली. दोन वर्षांनंतर ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये परतलेल्या संजूने सलग दुसरे शतक झळकावले. त्याने २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचे शतक झळकावले होते.