
भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमदने नुकतेच एसेक्स काऊंटी क्लबसोबत काही दिवसांपूर्वी करार केला होता. त्यानंतर लगेचच त्याने रविवारी (२९ जून) यॉर्कशायरविरुद्ध पदार्पणही केले. मात्र त्याच्यासाठी हे पदार्पण चढ-उतारांचे राहिले.
या सामन्यात पहिल्या दिवशी खलील ड्रेसिंग रुममध्येच होता. कारण या सामन्यात एसेक्स प्रथम फलंदाजीला उतरले आणि पहिला संपूर्ण दिवस त्यांच्या फलंदाजांनी खेळून काढला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र खलील फलंदाजी आणि नंतर गोलंदाजी करतानाही दिसला.