Khalid Jamil: मुंबईचे खालिद जमील प्रशिक्षकपदी; भारतीय फुटबॉल संघाला मार्गदर्शन करणार
Indian Football: खालिद जमील यांची भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली असून, १३ वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतीय व्यक्तीला हे पद मिळाले आहे. त्यांच्या कालावधीसंदर्भातील निर्णय लवकरच घेतला जाणार आहे.
नवी दिल्ली : कुवेत येथे जन्मलेले आणि मुंबईत वास्तव्यास असलेले खालिद जमील यांची भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. मागील १३ वर्षांच्या कालावधीत पहिल्यांदाच भारतीय व्यक्तीकडे फुटबॉल संघाचे प्रशिक्षकपद सोपवण्यात आले आहे.