Kieron Pollard : मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक होताच पोलार्डचा मोठा निर्णय! CSK फ्रँचायझीच्या संघाला धक्का...; नेमकं काय केलं?

Kieron Pollard appointed Mumbai Indians head coach: मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक होताच केरॉन पोलार्डने मोठा निर्णय घेतला. आगामी SA20 हंगामासाठी जॉबर्ग सुपर किंग्सकडून खेळण्यास त्याने असमर्थता कळवली. काय आहे नेमकं प्रकरण?
Kieron Pollard

Kieron Pollard

Updated on: 

Kieron Pollard Turns Down Joburg Super Kings' SA20 Stint: मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२७ हंगामासाठी केरॉन पोलार्डची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आणि त्यानंतर लगेचच त्याने मोठा निर्णय घेतला आहे. आगामी SA20 हंगामात जॉबर्ग सुपर किंग्सकडून खेळता येणार नसल्याचे पोलार्डने संघ व्यवस्थापनाला कळवले आहे. SA20 लीगमध्ये पोलार्ड मुंबई इंडियन्स फ्रँचायझीची साथ सोडून जॉबर्ग सुपर किंग्सच्या ताफ्यात यंदाच दाखल झाला होता, परंतु त्याने आता त्यांच्याकडून खेळण्यास असमर्थता दर्शवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com