KKR New Captain: अजिंक्य रहाणे कोलकाता नाइट रायडर्स नवा कर्णधार; २३ कोटी दिलेल्या वेंकटेश अय्यरकडे दिली मोठी जबाबदारी....

KKR Announced Ajinkya Rahane as New Captain: कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाने IPL 2025 साठी अजिंक्य रहाणे याची कर्णधारपदी, तर वेंकटेश अय्यर याची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्याची अधिकृत घोषणा केली.
KKR captain Ajinkya Rahane
KKR announce Ajinkya Rahane as captainesakal
Updated on

AJINKYA RAHANE NEW CAPTAIN OF KKR FOR IPL 2025: कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या पर्वासाठी अजिंक्य रहाणे याची कर्णधारपदी, तर वेंकटेश अय्यर याची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्याची अधिकृत घोषणा केली.

आयपीएल २०२५ च्या लिलावात सुरुवातीच्या टप्प्यात अनसोल्ड राहिलेल्या अजिंक्यला गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सने अंतिम टप्प्यात मुळ किंमतीत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.

आयपीएल विजेत्या श्रेयस अय्यरला रिलिज केल्यानंतर KKR कडे अनुभवी खेळाडू नव्हता आणि अजिंक्यच्या निवडीनंतर तोच कर्णधार असेल हे निश्चित मानले गेले होते. पण, वेंकटेश अय्यरही या शर्यतीत होता. आज अखेर अजिंक्यच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com