आयपीएल २०२६ साठी ट्रेड विंडो सुरू असून संजू सॅमसनचा RR मधून बाहेर पडण्याचा निर्णय चर्चेत आहे.
चेन्नई सुपर किंग्ससोबतचे चर्चेचे प्रयत्न RR च्या मागण्यांमुळे फसले.
आयपीएल २०२४ विजेता कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आता सॅमसनसाठी जोरदार प्रयत्न करत आहे.
Sanju Samson to KKR transfer rumours: संजू सॅमसनचा इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये भाव आणखी वाढलेला दिसतोय. आयपीएलच्या पुढील पर्वासाठी ट्रेड विंडो सुरू आहे आणि यात राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराने कल्ला केला आहे. आयपीएलचे ११ पर्व राजस्थानकडून खेळणाऱ्या संजूला आता या फ्रँचायझीकडून खेळायचे नाही, असे वृत्त आहे. तो चेन्नई सुपर किंग्सच्या ( csk) ताफ्यात जाईल अशी जोरदार चर्चा होती, परंतु RR ने केलेल्या मागणींमुळे चेन्नई फ्रँचायझीने माघार घेतली. चेन्नईच नव्हे तर संजू सॅमसनला आपल्या संघात घेण्यासाठी आणखी काही फ्रँचायझी आहेत. त्यात आयपीएलचा माजी विजेता संघ आघाडीवर आल्याचे दिसतेय.