Who will be India’s next Test captain? टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी अनुक्रमे ७ आणि १२ मे रोजी कसोटीतून निवृत्ती जाहीर केली. त्यांच्या निवृत्तीमुळे संघात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. रोहित ४ वर्ष टीम इंडियाचा कसोटी कर्णधार होता, तर कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाने ८ वर्षांत परदेशात १५ कसोटी सामने जिंकले. आता भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे आणि त्यासाठी लवकरच संघ जाहीर होण्याची शक्यता आहे. याचवेळी टीम इंडियाचा नव्या कसोटी कर्णधाराचीही घोषणा होईल.