KKR stake Sell: कोलकाता नाइट रायडर्सला मिळणार नवा सह मालक, ३७३६कोटींचा सौदा; IPL 2027 Auction पूर्वी मोठी घडामोड

Jay Mehta to sell half of his 45 percent stake in KKR: आयपीएल २०२७ च्या लिलावापूर्वी कोलकाता नाइट रायडर्सच्या मालकी हक्कात मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आयपीएल २०२७ पूर्वी KKR च्या मालकी रचनेत नेमका काय बदल होतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
Jay Mehta to sell half of his 45 percent stake in KKR

Kolkata Knight Riders Stake Sale: Jay Mehta Set to Sell Half of His 45% Stake to US-based investment management firm Ares Management  for about $ 400 million

esakal

Updated on: 

Who will become the new co-owner of Kolkata Knight Riders? कोलकाता नाइट रायडर्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२७ पूर्वी नवा सह मालक मिळण्याचे वृ्त्त समोर आले आहे. आयपीएल २०२७ लिलावासाठी मंगळवारी सर्व फ्रँचायझींनी त्यांच्या संघात कायम ठेवलेल्या व करारमुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. १६ डिसेंबरला गोव्यात लिलाव पार पडणार आहे आणि त्यात KKR च्या ताफ्यातील हालचालींनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री जुही चावलासह तिचे पती जय मेहता हे KKR चे सह मालक आहेत. पण, आता त्यात नवा मालक येणार आहे.

Loading content, please wait...