भारतीय संघात स्थान मिळत नाही म्हणून, कुलदीप यादवने निवडली दुसरी वाट! आता 'या' परदेशी संघासाठी खेळणार पाच वन डे सामने

Kuldeep Yadav signs for Yorkshire County Cricket: भारतीय संघात सातत्याने संधी न मिळाल्याने अनुभवी फिरकीपटू कुलदीप यादवने इंग्लंडमधील काउंटी क्रिकेटमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
Kuldeep Yadav signs for Yorkshire County Cricket

Kuldeep Yadav signs for Yorkshire County Cricket

ESAKAL

Updated on

Kuldeep Yadav One Day Cup and County Championship: मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, परदेशातील वन डे सामन्यात कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधीच देत नाही... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही हे चित्र पाहायला मिळाले. भारताच्या यशस्वी फिरकीपटूंपैकी एक असलेल्या कुलदीपवर अन्याय होत असल्याची टीका माजी खेळाडूंनी केली. १२१ वन डे सामन्यांत १९४ आंतरराष्ट्रीय विकेट्स नावावर असूनही कुलदीप उपेक्षित राहतोय आणि त्यामुळेच त्याने एक धाडसी निर्णय घेतला आहे. भारताचा हा फिरकीपटू आता परदेशात जाऊन वन डे क्रिकेट खेळणार आहे, पण भारतासाठी नव्हे, तर...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com