

Kumar Sangakkara
Sakal
टी२० वर्ल्ड कप सुरु असतानाच काही दिवसांपूर्वीच भारताचा खेळाडू रिंकु सिंगला पितृशोक झाला होता. आता यानंतर काही दिवसातच आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे.
श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू कुमार संगकारा (Kumar Sangakkara) याला नुकताच पितृशोक झाला आहे. मंगळवारी दुपारी त्याच्या वडिंलांचे क्षेमा संगकारा यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाबाबत कुटुंबाने माहिती दिली असून बुधवारी अत्यंसंस्कार केले जाणार आहेत.