
लॉस एंजेलिस येथे २०२८ मध्ये ऑलिंपिकचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवात क्रिकेट या खेळाचाही समावेश करण्यात आला आहे. आता आयसीसी व ऑलिंपिक आयोजन समितीकडून ऑलिंपिकमधील क्रिकेट या खेळाच्या लढती जेथे खेळवण्यात येणार आहेत, त्या स्थळाची घोषणा करण्यात आली आहे.
दक्षिण कॅलिफोर्नियातील पोमोना या शहरात क्रिकेट या खेळातील स्पर्धेच्या लढती रंगणार आहेत.