

VVS Laxman
esakal
VVS Laxman Asian Games 2026: भारतीय क्रिकेट संघ आता आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने(bcci) भारतीय पुरुष संघाची घोषणा आधीच केली असून, संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आली आहे. आता या संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी व्ही.व्ही.एस. लक्ष्मण(VVS Laxman) सांभाळणार असल्याच सांगितल जात आहे.
आशियाई स्पर्धा आणि वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे मालिका एकाच काळात येत असल्याने भारतीय क्रिकेटमध्ये दोन संघांसाठी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघासोबत जाणार आहेत.