ओव्हल इनव्हिझिबल्स ने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १८० धावा केल्या, डोनोव्हन फरेरा (६३) आणि जॉर्डन कॉक्स (४४) चमकले.
बर्मिंगहॅम फोनिक्स ने ९८ चेंडूत ६ बाद १८२ धावा करून ४ विकेट्स व २ चेंडू राखून सामना जिंकला.
लिएम लिव्हिंगस्टोनने फक्त २७ चेंडूत ७ चौकार व ५ षटकारांसह ६९ नाबाद धावा ठोकल्या.
Rashid Khan worst bowling performance in The Hundred : दी हंड्रेड लीगमध्ये मंगळवारी मध्यरात्री रोमांचक सामना पाहायला मिळाला. ओव्हल इनव्हिझिबल्स विरुद्ध बर्मिंगहॅम फोनिक्स लढतीत लिएम लिव्हिंगस्टोनने मैदान गाजवला. फोनिक्स संघाने ४ विकेट्स व २ चेंडू राखून सामना जिंकला. लिएमने २७ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह ६९ धावांची नाबाद खेळी केली. त्याने राशिद खानच्या एका षटकात टोलेजंग फटके खेचले आणि अफगाणिस्ताच्या गोलंदाजाच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला.