
IPL’S BIGGEST CONTROVERSIES CHECK LIST: इंडियन प्रीमिअर लीगच्या १८व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होत आहे. आयपीएलने भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला. जगातील प्रत्येक खेळाडूला या लीगमध्ये खेळायचं आहे, कारण या लीगमधून मिळणारी प्रसिद्धी खेळाडूला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारी आहे. पण, याच लीगमधील एखादी चूकही खेळाडूची कारकीर्द संपवणारी ठरल्याचा इतिहास आहे. आयपीएलच्या सर्वच पर्वात काही ना काही वाद झालेले पाहायला मिळाले आहेत. खेळाडूंमधील भांडणं ही तर नित्याचीच झाली आहेत.