
Most Test runs in a Calendar Year for India in 2024 :
भारतीय संघाला २०२४ वर्षाच्या शेवटच्या कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न कसोटीत भारताला १८४ धावांनी पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या ३४० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला १५५ धावा करता आल्या. २०२४ मध्ये भारताने १५ पैकी ८ कसोटी सामने जिंकले, परंतु ६ मध्ये त्यांना हार पत्करावी लागली आहे. १ सामना ड्रॉ राहिला आहे. पण, भारताच्या या प्रवासात यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal) याने फलंदाजीत एकहाती किल्ला लढवल्याचे पाहायला मिळतेय..