
Maharashtra Cricket Association: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने (MCA) सोमवारी नव्या लोगोचे अनावरण केले आहे. याशिवाय महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुण्यातील नव्या कार्यालयाचेही उद्घाटन करण्यात आले आहे.
दरम्यान, एमसीएच्या नव्या लोगोचा व्हिडिओ अध्यक्ष रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी हा व्हिडिओ शेअर करताना लिहिलंय 'छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन चालणाऱ्या #MCA च्या नवीन लोगोचं आज अनावरण झालं...'