Vijay Hazare Trophy 2024-25: गोलंदाजांच्या भेदक कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राने मेघालयचा नऊ विकेट आणि २१४ चेंडू राखून धुव्वा उडवला आणि विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत सलग तिसरा विजय मिळवला..नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या मेघालयचा डाव ३७.१ षटकांत ११३ धावांत गुंडाळल्यानंतर महाराष्ट्राने हे आव्हान १४.२ षटकांत पार केले आणि ब गटात १२ गुणांसह पहिले स्थान कायम ठेवले आहे..विजयासह सरासरीही अधिक चांगली करण्याची समोर आलेली संधी महाराष्ट्राच्या सलामीवीरांनी साधली. गेल्या सामन्यात शतकी खेळी करणारा ऋतुराज गायकवाड आज सलामीला आला नाही..ओम भोसले आणि सिद्धेश वीर यांनी सलामी केली आणि १६.५ षटकांत ९७ धावा फटकावल्या. ओम भोसले ४६ धावांवर बाद झाला तर सिद्धेश वीरने नाबाद ५७ धावा केल्या. सिद्धेशने गोलंदाजीतही तीन विकेटचे योगदान दिले.महाराष्ट्राकडून सत्यजित बच्छाव आणि रजनीश गुरबानी यांनीही प्रत्येकी दोन विकेट मिळवल्या. महाराष्ट्राचा पुढचा सामना हिमाचल प्रदेशविरुद्ध होणार आहे..Vijay Hazare Trophy : मुंबईचा अरूणाचल प्रदेशवर दणदणीत विजय; ७३ धावांवर डाव गुंडाळला अन् ५.३ षटकांत सामन्याचा निकाल लावला.संक्षिप्त धावफलक :मेघालय : ३७.१ षटकांत सर्वबाद ११३ (अप्रित भाटेवरा ३४, आकाश चौधरी २३, , रजनीश गुरबानी ४.१-१-६-२, सत्यजित बच्छाव ८-१-१९-२, सिद्धेश वीर १०-१-२८-३) पराभूत वि. महाराष्ट्र : १४.२ षटकांत १ बाद ११५ (ओम भोसले ४६-४५ चेंडू, ३ चौकार, १ षटकार, सिद्धेश वीर नाबाद ५७-६६ चेंडू, ८ चौकार)