
Vijay Hazare Trophy Maharashtra vs Himachal Pradesh: सिद्धेश वीरचे दीड शतक आणि अंकित बावणेची शतकी खेळी यामुळे साडेतीनशे धावांचा डोंगर उभा करणाऱ्या महाराष्ट्राने विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत हिमाचल प्रदेश संघावर ८४ धावांनी विजय मिळवला आणि ब गटातील आपले अव्वल स्थान अधिक बळकट केले.