
Mumbai vs Punjab Vijay Hazare Trophy : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईच्या संघाने पंजाबविरुद्ध अविश्वसनीय पुनरागमन केले. अर्शदीप सिंगच्या ( Arshadeep Singh) भेदक माऱ्यासमोर मुंबईची अवस्था ५ बाद २८ धावा अशी अवस्था केली होती. इथून मुंबईला डोकं वर काढणं अवघड वाटत होतं, कारण श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव व शिवम दुबे हे आंतरराष्ट्रीय अनुभव गाठीशी असलेले फलंदाज माघारी परतले होते. पण, अथर्व अंकोलेकर ( Atharva ankolekar ) आणि शार्दूल ठाकूर ( shardul thakur ) ही जोडी मैदानावर उभी राहिली आणि दमदार खेळ करून गेली.