Maharashtra Champions League: महाराष्ट्र क्रिकेट चॅम्पियन्स लीग स्पर्धेचा श्रीगणेशा!आठ संघांचा समावेश

Maharashtra Cricket Champions League 2026 details : मुंबईतील एमसीए क्लब, बीकेसी येथे ‘महाराष्ट्र क्रिकेट चॅम्पियन्स लीग’ या स्पर्धेचा शानदार शुभारंभ करण्यात आला. या सोहळ्याला भारताचे माजी कर्णधार Sunil Gavaskar, तसेच Karsan Ghavri आणि Amol Muzumdar यांची विशेष उपस्थिती लाभली.
Maharashtra Tennis Cricket Champions League in Mumbai.

Maharashtra Tennis Cricket Champions League in Mumbai.

Updated on

मुंबई : मुंबईतील एमसीए क्लब, बीकेसी येथे ‘महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन्स लीग’ या स्पर्धेचा श्रीगणेशा करण्यात आला. या सोहळ्याला भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर, करसन घावरी आणि अमोल मुझुमदार या मान्यवरांची उपस्थिती लाभली. एकनाथ सोलकर फाउंडेशन आणि रोज मर्क लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या लीगमध्ये महाराष्ट्रातील पहिल्या प्रीमियर टेनिस क्रिकेट लीग अंतर्गत आठ संघांचा समावेश असणार आहे. आतापर्यंत या संघांचे आठ कर्णधार निश्चित झाले असून, उर्वरित खेळाडूंची निवड आगामी दिवसांत लिलाव पद्धतीद्वारे करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com