

Maharashtra U23 Cricket
sakal
पुणे : रांची येथे सुरू असलेल्या बीसीसीआयच्या २३ वर्षांखालील गटाच्या एकदिवसीय राज्य करंडक एलिट ‘अ’ गटाच्या साखळी क्रिकेट स्पर्धेत कर्णधार दिग्विजय पाटीलने केलेल्या (११६) शानदार शतकी खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने बिहार संघाचा १५४ धावांनी पराभव केला. महाराष्ट्राचा हा सलग चौथा विजय ठरला आहे.