Maharashtra U23 Women Cricket: महिला २३ वर्षाखालील क्रिकेट; महाराष्ट्राने तमिळनाडूवर ८ विकेटने मात
Khushi Mulla: पुदुच्चेरीतील २३ वर्षांखालील महिला एकदिवसीय स्पर्धेत खुशी मुल्ला आणि भाविका अहिरेच्या जोरावर महाराष्ट्राने तमिळनाडूवर आठ विकेटनी विजय मिळवला. सलग पाचव्या विजयासह महाराष्ट्राने बाद फेरी गाठली.
पुणे : बीसीसीआय’च्या वतीने पुदुच्चेरी येथे झालेल्या २३ वर्षांखालील गटाच्या महिला गट एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत खुशी मुल्ला आणि भाविका अहिरेच्या अर्धशतकाच्या जोरावर महाराष्ट्राने तमिळनाडूवर आठ विकेटनी मात केली.