Ranji Trophy: कर्नाटकचा संघ १५७ धावांनी पुढे; मयांकचे अर्धशतक, रणजी करंडक, महाराष्ट्राकडून जलाज सक्सेना, मुकेश चौधरी चमकले
Mayank Agarwal’s Half-Century Steadies Karnataka: महाराष्ट्र-कर्नाटक रणजी लढत रंगात; मयांक अगरवालचे अर्धशतक, मुकेश चौधरीची प्रभावी गोलंदाजी. अखेरच्या दिवशी महाराष्ट्राला विजयाची संधी जिवंत ठेवण्यासाठी कर्नाटकचे पाच फलंदाज बाद करणे आवश्यक.
पुणे : महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यामधील रणजी क्रिकेट करंडकातील ब गटातील साखळी फेरीचा सामना तिसऱ्या दिवसअखेरीस रंगतदार अवस्थेत आला आहे. कर्नाटकचा संघ १५७ धावांनी पुढे असून, त्यांचे पाच फलंदाज बाकी आहेत.