इंग्लंडने लॉर्ड्स कसोटीत रोमहर्षक विजय मिळवून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली
भारत-इंग्लंड यांच्यातला चौथा कसोटी सामना २३ जुलैपासून मँचेस्टर येथे होणार
जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यावरून पुन्हा चर्चा सुरू
India vs England 4th Test : भारतीय संघाला लॉर्ड्स कसोटीत थोडक्यात हार मानावी लागली. रवींद्र जडेजा मैदानावर उभा राहून खिंड लढवत होता, परंतु मोहम्मद सिराजची दुर्दैवीरित्या विकेट पडली आणि इंग्लंडने २२ धावांनी मॅच जिंकून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. आता शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया पुन्हा पुनरागमनासाठी सज्ज होत असताना मोठा धक्का बसला आहे. भारताचा प्रमुख जलदगती गोलंदाज सरावात जखमी झाला आणि त्याच्या हातावर टाके टाकावे लागू शकतात.