Mohammad Shayan was ruled out of the U19 World Cup due to injury
esakal
Pakistan wicketkeeper Mohammad Shayan ruled out of U19 World Cup: १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जागा मिळवण्याच्या तयारीत असलेल्या पाकिस्तान संघाला शुक्रवारी मोठा धक्का बसला. पाकिस्तानचा यष्टीरक्षक-फलंदाज मोहम्मद शायन याला वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. सुपर सिक्स सामन्यात पाकिस्तानला रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी भारताशी सामना करायचा आहे. पण, १८ वर्षीय खेळाडूला दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर जावे लागले.