
लंडन : इंग्लंडमधील या कसोटी मालिकेत आपण तीनच सामने खेळू, असे जसप्रीत बुमराने अगोदरच कळवले होते. त्याच्यावर असलेल्या सामन्यांच्या ताणाचा विचार करता बुमराच्या विचाराचा सन्मान करायला हवा, अशा शब्दांत भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन दोश्खात यांनी त्याची पाठराखण केली आहे.