६ विकेट्स घेऊनही मानव सुथारला नाही मिळाल मेडल; BCCI च्या ड्रेसिंग रुममध्ये दुसराच खेळाडू ठरला 'इम्पॅक्ट प्लेअर'
BCCI Shares Viral Dressing Room Video: मानव सुथारने अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीत ६ विकेट्स घेत शानदार पदार्पण केले, पण ड्रेसिंग रूममधील मेडल प्रसिद्ध कृष्णाला मिळाल्याने चर्चेला उधाण आले.
BCCI Shares Viral Dressing Room Video: भारत आणि अफगाणिस्तान(IND VS AFG) यांच्यात एकमेव कसोटी सामना खेळला गेला. ज्यामध्ये पदार्पण करणाऱ्या नवख्या खेळाडूने आपल्या गोलंदाजीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.