

Manav Suthar equals 93 year old cricket record
esakal
Manav Suthar historic bowling record in Sri Lanka: भारत आणि श्रीलंका(IND vs SL) यांच्यात ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर १६५ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
मात्र, या सामन्यात मानव सुथारने केलेली कामगिरीही खास ठरली आहे. सुथारने आपल्या पहिल्या मायदेशातील आणि पहिल्या परदेशातील कसोटी सामन्यात प्रत्येकी पाच बळी घेण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याने ९३ वर्षांपूर्वीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.