ICC Men's Cricket World Cup League 2 : वर्ल्ड कप लीग २ सामन्यात नेदरलँड्सने वन डे क्रिकेटमधील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च धावांचा यशस्वी पाठलाग केला. मॅक्स ओ'डॉडच्या नाबाद १५८ धावांनी जॉर्ज मुन्सीच्या १९१ धावांच्या खेळीवर पाणी फिरवले. मुन्सीने या सामन्यात १२२ धावा या फक्त चौकार-षटकारांनी मिळवल्या, ज्या स्कॉटलंडच्या फलंदाजाने वन डेतील सर्वोत्तम ठरल्या. यापूर्वी कॅलम मॅकलीओडने ९८ धावा अशा चोपल्या होत्या. मुन्सीच्या १९१ धावा या स्कॉटलंडकडून वन डे क्रिकेटमधील सर्वोत्तम वैयक्तिक धावा ठरल्या.