
Shardul Thakur hat-trick MUM vs MEG: मुंबईने रणजी करंडक स्पर्धेत मेघालयविरुद्ध पहिल्या अडिच तासातच सामन्यावर पकड घेतली. शार्दूल ठाकूरने त्याच्या दुसऱ्या षटकात हॅटट्रिक घेऊन मेघालयची अवस्था ६ बाद २ धावा अशी केली होती. पण, त्यानंतर शेपटाने संघर्ष केला आणि संघाला समाधानकारक टप्पा गाठून देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही मुंबईच्या गोलंदाजांनी त्यांना पहिल्या सत्रात ऑल आऊट केले.