ICC Men's Cricket World Cup 2027 dates
esakal
ICC Men's Cricket World Cup 2027 dates announced: विराट कोहली व रोहित शर्मा यांनी कसोटी व आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्त घेतली आहे आणि भारताचे सुपरस्टार केवळ वन डे फॉरमॅट खेळत आहेत. या दोघांनी २०२७ चा वर्ल्ड कप खेळण्याची आणि जिंकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण, ३९ वर्षांचा रोहित व ३६ वर्षांचा विराट, पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत स्वतःचा फिटनेस कसा राखतात, यावर त्यांचा संघातील समावेश अलवंबून असेल. अशात या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या महत्त्वाच्या तारखा समोर आल्या आहेत.