Kieron Pollard | MI Cape Town squad after SA20 2027 auction:
Kieron Pollard released by MI Cape Town ahead of SA20 2027: दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगच्या पाचव्या पर्वासाठी बुधवारी खेळाडूंचा लिलाव पार पडला. लिलावातील प्रमुख बोलींमध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डु प्लेसिस आघाडीवर होता. त्याला ताफ्यात समाविष्ट करण्यासाठी फ्रँचायझींमध्ये कमालीची उत्सुकता दिसून आली.
अखेर जोहान्सबर्ग सुपर किंग्स (JSK) ने त्याला आपल्या ताफ्यात घेतले आणि तो या लिलावातील सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक ठरला. त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्सचा मालकी हक्क असलेल्या JSK फ्रँचायझीने किरॉन पोलार्डला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचा MI Cape Town संघ या लीगमध्ये खेळतोय आणि पोलार्डला रिलीज करण्याचा निर्णय चाहत्यांना फार रुचलेला नाही.