Virat Kohli
Virat Kohliesakal

IND vs ENG: मी भारतात असतो, तर विराट कोहलीला इंग्लंड दौऱ्यासाठी कर्णधार केलं असतं! दिग्गजाच्या विधानानंतर BCCI काय करणार?

Shubman Gill as vice-captain with Kohli in ENG tour 2025 : रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर विराटनेही आता कसोटी फॉरमॅटमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट केले. बीसीसीआयने त्याला विनंती केली आहे, परंतु विराट त्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे बोलले जातेय.
Published on

Virat Kohli As Captain In England? भारतीय संघ जून-जुलै महिन्यात इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्याआधीच रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आणि कर्णधारपदाची जागा रिक्त आहे. त्यात विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेट खेळण्याची इच्छा नसल्याचे जाहीर केले आणि त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाच्या ताफ्यात अनुभवी खेळाडूंची उणीव जाणवणार हे निश्चित आहे. जसप्रीत बुमराह या संघात असेल, परंतु तो सर्व पाच कसोटी खेळेल का, यावरही प्रश्नचिन्ह आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com