New Zealand Defeat Pakistan in 2nd ODI
न्यूझीलंडने सलग दुसऱ्या वन डे सामन्यात पाकिस्तानचे वस्त्रहरण केले. मिचेल हे ( Mitchell Hay ) व मुहम्मद अब्बास यांच्या दमदार खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने ८ बाज २९२ धावा कुटल्या. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर पाकिस्तानकडून आज चांगल्या खेळीची अपेक्षा होती. पण, त्यांचे आघाडीचे सहा फलंदाज एकेरी धावसंख्येवर माघारी परतले. बाबर आझम व कर्णधार मोहम्मद रिझवान यांचे अपयश संघाला वारंवार महागात पडतेय, हे पु्न्हा एकदा सिद्ध झाले.