Major League Cricket Washington Freedom vs Los Angeles Knight Riders : ग्लेन मॅक्सवेलने बुधवारी ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. त्याने मेजर लीग क्रिकेटमध्ये लॉस अँजेलीस नाइट रायडर्सच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करताना ट्वेंटी-२०तील आठवे शतक पूर्ण केले. त्याने पहिल्या १५ चेंडूंत ११ धाव केल्या होत्या, परंतु धावांचा वेग वाढवताना ४८ चेंडूंत शतक पूर्ण केले. त्याने २ चौकार व १३ षटकारांचा पाऊस पाडला. मॅक्सवेलच्या दमदार शतकाच्या जोरावर वॉशिंग्टन फ्रीडम संघाने ५ बाद २०८ धावांचा डोंगर उभा केल्या. एकवेळ असा होता की १२ षटकात फ्रीडमच्या ५ विकेट्स ९२ धावांत पडल्या होत्या आणि त्यानंतर मॅक्सवेलचे वादळ घोंगावले.