Hetmyer Finishes it Off in Style, Orcas Pull Off Highest Chase Ever
सलग १० सामने गमावणाऱ्या Seattle Orcas संघाने मेजर लीग क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करून इतिहास रचला. निकोलस पूरनचे शतक अन् तजिंदर सिंगच्या वादळी ९५ धावांच्या जोरावर MI New York संघाने २३७ धावांचा डोंगर उभा केला होता. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना गेला अन् शिमरोन हेटमायरने ट्वेंटी-२०तील सर्वात अनुभवी खेळाडू किरॉन पोलार्डच्या शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून थरारक विजय मिळवून दिला.