
Pakistan Cricketers Fined Amid Embarrassing Defeat to NZ : आधी ट्वेंटी-२० मालिकेत ४-१ अशी हार, नंतर वन डे मालिकेत ३-० अशी धुळधाण... पाकिस्तान क्रिकेट संघाच्या मागे लागलेले अपयशाचे ग्रहण काही केल्या सुटता सुटत नाहीए.. चॅम्पियन्स ट्रॉफीतील अपयशानंतर आपली प्रतिमा सुधारण्याच्या निर्धाराने न्यूझीलंड दौऱ्यावर पाकिस्तानचा क्रिकेट संघ पोहोचला.. दौऱ्यापूर्वी त्यांनी अनेक गर्जना केल्या, परंतु न्यूझीलंडच्या ब संघासमोर शेजारी प्रत्यक्ष म्यँ म्यँ करताना दिसले. त्यात आता त्यांच्या खिशाला कात्री लागली.