Mohammed Shami reacts to Bhuvneshwar Kumar's India selection
Mohammed Shami reacts to Bhuvneshwar Kumar's India selection: जवळपास चार वर्षानंतर भुवनेश्वर कुमारचे भारतीय संघात पुनरागमन झाले आणि आता चाहते मोहम्मद शमीच्या निवडीकडे लक्ष लावून बसले आहेत. भुवीने इंडियन प्रीमिअर लीगच्या मागील दोन पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या जेतेपदात महत्त्वाचा वाटा उचलला. त्यामुळेच त्याची न्यूझीलंड दौऱ्यावरील ट्वेंटी-२० मालिकेत निवड झाली. अजित आगरकरचा निवड समिती प्रमुख म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर भुवीच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला. तसाच तो मोहम्मद शमीचाही होईल, अशी अनेकांना आशा आहे. पण, ३६ वर्षीय शमीचं मत काही वेगळं आहे...