

Mohammed Shami Comeback
esakal
Mohammed Shami Comeback: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी बऱ्याच काळापासून टीम इंडियापासून बाहेर आहे. दुखापतीमुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. शमीने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०२५मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला होता. त्यानंतर तो संघाबाहेर आहे.
गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आणि अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती शमीपासून पुढे गेल्याचे दिसत आहे. मात्र, भारताचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी शमीला अजून एक संधी मिळायला हवी, असे म्हटले आहे.