Mohammad Shami चा टीम इंडियासोबतचा प्रवास संपला? निवड समितीने त्याला सोडून पुढे जाण्याचा प्लॅन बनवलाय... GEN Z वर लक्ष

Mohammed Shami omitted from India Test squad: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात त्याला स्थान मिळाले नाही.
Is Mohammed Shami's India career over

Is Mohammed Shami's India career over

esakal

Updated on

Mohammed Shami latest Team India news: BCCI ने आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ जाहीर केला. प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या फिटनेबाबत संभ्रम असताना मोहम्मद शमीचे पुनरागमन होईल, अशी अपेक्षा होती. पण, निवड समितीने पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजाला वगळले. श्रीलंका दौऱ्यासाठी निवडलेल्या १५ सदस्यीय संघात जस्सीसह मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा व गुरनूर ब्रार हे जलदगती गोलंदाज दिसत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शमीच्या कारकिर्दीबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. संघ व्यवस्थापन व निवड समिती शमीला वारंवार डावलत आहेत आणि आता हाती आलेल्या वृत्तानुसार शमीचा भारतीय संघासोबतचा प्रवास संपलाच आहे.. कारण निवड समिती युवा गोलंदाजांसह पुढे जाण्याची योजना आखत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com