
IND vs PM-XI Practice Match : भारताने प्राईम मिनिस्टर इलेव्हन संघाविरूद्ध सराव सामन्यात ६ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात भारताच्या ७ खेळाडूंनी गोलंदाजी केली. भारतीय गोलंदाजांनी त्यांचा डाव ४४ व्या षटकात २४० धावांवर गुंडाळला. सामन्यातील पहिली विकेट वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने घेतली. सामन्यादरम्यान एका क्षणी सिराज चिडलेला पाहायला मिळाला. त्याच्याकडून रोहितचा प्रसिद्ध डायलॉग ऐकायला मिळाला.